मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब
|
The Philanthropist The Consultant The Socialist
Wednesday, 3 October 2018
एकजण काल परवा मला भेटला आणि आनंदात हसत-हसत म्हणाला, काय कोणत्या बाईचा हात धरला. मला खूप राग आला होता. पण संयम पाळणे गरजेचे आहे असे स्वतःच्याच मनाला भासवून मी शांत झालो. ज्यावेळी तुम्ही चूक केलेली नसते आणि तुम्ही चूक केली आहे असा खोटा प्रचार होऊ लागतो, त्यावेळी आपले मानसिक संतुलन ढळते आणि आपण भांडू लागतो. पण मी असे काही केले नाही. किंवा त्याला स्पष्टीकरणसुद्धा देत बसलो नाही. जो माणूस माझ्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांनी खूष होऊन विकृत आनंद घेत असेल तर त्याला स्पष्टीकरण देऊन आपली ताकद का व्यर्थ घालवायची. आणि तसाही तो असत्याचा पुजारी सत्याचा प्रचार कुठे करणार आहे.
थोड्यावेळाने तो माणूस पुन्हा खोटी सहानुभूती दाखवत बोलला. विनयभंग- विनयभंग अशी बोंब सगळीकडे उठली आहे. खोटी सहानुभूती दाखवत पुन्हा म्हणाला, तू असे करू शकत नाहीस पण लोक बोलतायत. मी हसलो आणि मला गोबेल्स नीती आठवली. एखादं असत्य पुन्हा पुन्हा सातत्याने सांगत राहीले की हळूहळू लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. जे प्रत्यक्षात नाही ते आहे, असे सतत भासवून, लोकांच्या मनावर ठसवून जनमतावर प्रभाव टाकण्याचे तंत्र म्हणजे गोबेल्स नीती. सध्या ही नीती राबवून मला म्हणजेच प्रमोद मांडवे यांना बदनाम करणे हे सामाजिक कार्य काही लोकांनी हाती घेतले आहे याचा मला राग नाही तर आनंदच आहे. निदान रिकामटेकडे काहीतरी काम करतायत. पण हे काम सत्याच्या बाजूने केले असते तर आदर्शवत म्हणता आले असते.
मी त्या माणसापुढे आनंदी चेहऱ्याने हसतच होतो. माझ्या निर्भीडपणामुळे तो थोडा बेचैन, नाराज झाला. मी असा खोटा आरोप होऊन सुद्धा शांत आहे, निवांत आहे, हसत-खेळत पुन्हा सामाजिक कामे हातात घेऊन कार्य करीत आहे, अश्या खोट्या आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही हे त्या माणसाच्या लक्षात आल्यावर त्याने चेहरा पाडला. एवढ्या अडचणीत सुद्धा तुमचं हसन हेच जगाच रडणं असतं. हे यावेळी माझ्या लक्षात आले. तुम्हाला जर कोणाला हरवायचे असेल तर तुमचा आनंद आणि तुमचे स्मित हास्य सर्वाना पराजित करू शकते. याचा प्रत्यक्ष धडा मला मिळाला.
दिवसेंदिवस विरोधक आणि असत्याचे पुजारी वाढत असताना मी संघर्ष सोडला नाही. गोबेल्स नीती वापरून लोकांच्या मनात मी आणि माझ्या चरित्र्याविषयी शंका निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. पण माझी मानसिक ताकद वाढतच आहे. जे सत्य असतात त्यांचे मनोबल नेहमी उच्च असते. म्हणून माझ्या हितचिंतकांसाठी एक ओळ लिहावी वाटली.
तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।
आपलाच
प्रमोद महादेव मांडवे
संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समुह
Labels:
ganesh,
mandave,
pramod,
pramod mandave,
shivshakti,
winaybhang,
गणेश,
प्रमोद,
बदनामी,
विनयभंग
मी कोण आहे...
मला ना कोणाचा राग आहे ना लोभ. माझी ना कोणाशी इर्षा आहे ना कोणाशी वैर. माझी जीवन जगण्याची पद्धत फक्त थोडी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, लो. टिळक, ने. सुभाषचंद्र बोस हे माझे आदर्श आहेत. समाजसेवा हाच माझा धर्म आणि संघर्ष हेच माझे कर्म आहे. जिथे अन्याय,अत्याचार दिसतो तिथे मी न्यायासाठी संघर्ष करतो. मला जे चांगले वाटते, ते मी करतो. काही लोक मला चांगले समजतात काही वाईट. मला तशी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. देवाला माहिती आहे माझा धर्माचा-सत्याचा मार्ग आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात मी कायम चकरा मारतो. कारण सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ सर्वसामान्य गरीब लोकांना मिळवून देऊ शकेन. माझ्या लोकांचे भले करू शकेन.
माझ्याजवळ जात-धर्म, वंश, रंग, कुळ याला थारा नाही. ' ज्याचे कर्म स्वच्छ तोच उच्च ' असा माझा विचार आहे. लोक मला चुकीचे ठरवण्यात व्यस्त असतात. माझ्यावर याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही मला एकदा भेटा तेंव्हा समजेल मी कसा आहे. लोक काहीही म्हणोत माझे मन साफ आहे. मी माझ्यासाठी नाही जगत. मी जगतोय माझ्या लोकांसाठी, समाजासाठी, देशासाठी, गोर- गरिबांसाठी, जनसामान्यांच्या हक्कासाठी.
" माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देने हाच आहे. जो समजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. " अशी माझी विचारधारा आहे. मी एक क्षत्रिय आहे, जो न्यायासाठी संघर्ष करतो. मी एक ब्राह्मण आहे, जो समाजाला शिक्षित करतो. मी एक वैश्य आहे, जो समाज संचलन करतो. मी एक क्षुद्र आहे, जो समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करतो. मी जन्माने क्षत्रिय आणि कर्माने क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण आहे. मी महादेवाचा- परमात्म्याचा एक अंश, एक आत्मा, एक मनुष्य आहे. मी प्रमोद मांडवे आहे.
आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती सोशल फौंडेशन
बदनामीचे षडयंत्र : जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी...
प्रमोद मांडवे वर खोटी विनायभंगाची केस केली आता तो आपल्या शरण येईल आणि मग पहिली केस माघारी घ्यायला लावायची आणि मगच विनायभंगाची केस मागे घेऊ. आता तू अडकलास तुला कमीतकमी 10 वर्षाची शिक्षा होईल. आता प्रमोद मांडवेचा माज जीरला. अश्या काल्पनिक सुखाने काहीजण विकृत मानसिक आनंद घेत आहेत. त्यांना मला सांगावयाचे आहे तुमची सगळी राजकीय ताकद मला अडकविण्यासाठी वापरली. खोटे नाटे करून माझ्यावर निर्लजपणाच्यापुढे जाऊन आरोप लावले. मला अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून आणि खोटी केस दाखल करावी यासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना राजकीय दृष्ट्या वेठीस धरले. तरीसुद्धा सत्य लपले नाही. तुम्ही तुमच्या नेतमंडळींना मला हरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यानिपन पुरेपूर प्रयत्न केले. पण तरीसुद्धा मी तुम्हाला घाबरत नाही. यावरून मी तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या तोडीचा आहे. असे मी किंवा इतर कोणीही म्हणत नाही तर ते तुम्हीच सिद्ध केले आहे.
आणि तुमचा असा गैरसमज असेल की मी विनयभंगाच्या खोट्या केसमधून सुटण्यासाठी माघार घेईन. हे तुमचे दिवास्वप्न आहे कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही। सत्य बाहेर येईलच आणि तरीसुद्धा तुमच्या कपटी बुद्धीने आणि सत्तेच्या मस्तीने माझ्यावर कटकारस्थान केलेच तर मी माझ्या मनाची अशी तयारी केली आहे की, सत्य रक्षणासाठी माझा बळी गेला तरी चालेल. मला खोट्या आरोपात संघर्ष करावा लागला तरी चालेल. मला बदनामी आणि त्रास, त्याग सहन करावा लागला तरी चालेल. मला स्वतः ला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली तरी चालेल. पण मी सत्यासाठी काहीही तडजोड करणार नाही. आणि हो ज्यांच्या प्रेरणेने मी जीवन जगतो आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, नेल्सन मंडेला, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही खोट्या आरोपात षडयंत्र आणि कटकारस्थानात बदनामी आणि शिक्षा सहन करावी लागली आहे. त्यांच्यापुढे मी काय गौण आहे. त्यांच्या एक टक्के फक्त मला सहन करावयाचे आहे. यासाठी या सर्व महापुरुषांनी मला आशीर्वाद दिला आहे.
काही राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली हे सर्व घडत आहे याची माहिती सर्वांना आहेच. त्यामुळे त्यांची सर्व पिलावळ मी पराजित होण्याची वाट पाहत आहेत. काही तत्त्ववेत्ते म्हणतात, जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी तुमचा व सत्याचा विजय सर्वात आनंद देणारा असतो. अश्या राजकीय नेत्यांना मला सांगावयाचे आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी कधीही तुमच्या वाटेला आलो नाही. पण तुम्हाला मी करत असलेले समाजकार्य आवडत नसेल तर तुम्हीपण फक्त राजकारण न करता, स्वार्थ न ठेवता माझ्यापेक्षा जास्त समाजकार्य करू शकता. यासाठी कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण तुमच्या गावगुंडांना पाठीशी घालणासाठी स्त्रीच्या अब्रूची काळजी न करता अशी खोटी केस करण्याच्या संकल्पनेला ' बुळगापणा ' असेच म्हणावे लागेल. असले कुटील उद्योग करण्यापेक्षा हिम्मत असेल तर समाजकार्य करा आणि गोरगरीब जनतेला न्याय द्या. तुम्ही लवकर सुधारा, स्वतःत बदल घडवा नाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच.
आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह
#IsupportGm
बदनामीचे षडयंत्र : सत्यमेव जयते ।
नमस्कार मी प्रमोद महादेव मांडवे. माझी आणि तुमची प्रत्यक्ष ओळख नसली तरी शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखत असाल अशी आशा करतो. गेले काही दिवस हे माझ्या आयुष्यातील वाईट नाही तर संघर्षमय व अधिक ऊर्जा निर्माण करणारे दिवस आहेत. आणि संघर्ष करायला मला खूप आवडत. तसेच संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पूजलाय. असो, हा लेख बनविण्याचा उद्देश एवढाच की काही लोक माझा भाऊ गणेश मांडवे याला दि. ६ रोजी काही गावगुंडांनी केलेल्या मारहाणीतून लक्ष विचलित व्हावे या उद्देशाने फेसबुक, व्हॉट्स अप व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या तथाकथित आई-बहिणींची इज्जत लुटली असा खोटा कंगवा करून आम्हाला बदनाम करण्यासाठी झटत आहेत. त्यांची लायकी, कार्य आणि चरित्र संपूर्ण तालुक्याला माहिती आहेच. पण वास्तविक तेच द्विधा मनस्थिती आहेत. कारण आधी ते माझा भाऊ गणेश मांडवे याने त्यांच्या काल्पनिक आई- बहिणींची इज्जत लुटली असे सांगत होते. आता मी प्रमोद मांडवे यांनी त्यांच्या काल्पनिक आई-बहिणीचा विनयभंग केला अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. यामागचा त्यांचा हेतू एव्हढाच आहे की, गणेश मांडवे याला झालेल्या मारहाणीची तक्रार मागे घ्यावी. आणि आमची बदनामी करावी. हे बदनामीचे षडयंत्र काही राजकीय मंडळी आणि गुंडांच्या सहकार्याने केले जात आहे.
पण महान तत्त्ववेत्ते म्हणतात, एखाद्या अस्सल बेवड्याने अथवा वेड्याने चांगल्या माणसाला शिव्या दिल्या अथवा खोटे आरोप केले तर त्याची बदनामी होत नाही. असो मी याविषयी कायदेशीर लढाई लढतच आहे. असे कटकारस्थान मीही करू शकतो पण मी सत्यवादी मनुष्य असून माझे कुटुंब खानदानी आणि सुसंस्कृत आहे.असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही एकतरी पुरावा तुमच्या आई-बहीनीची इज्जत लुटल्याच्या अथवा विनयभंग केल्याचा द्यावा. आम्ही स्वतः अग्निकुंडात उडी मारून आमची पवित्रता सिद्ध करू. अश्या खोटे आरोप करणाऱ्यांनी आपल्याच घरातील आई-बहनिची इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून दुसऱ्यावर निराधार आरोप करण्यापेक्षा आपल्या चुकांचे प्रायश्चित्त कसे करावे याचा विचार करावा. परंतु यामध्ये विशेष वाटते ते राजकीय व्यक्तींचे आणि मान्यवरांचे. काही राजकीय व्यक्ती गणेश मांडवे यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना आणि माझ्यावर खोटे विनायभंगाचे आरोप लावणाऱ्या महिलेला सहकार्य करीत आहेत. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ज्या सापांना तुम्ही आज दूध पाजताय आणि ज्यांची तुम्हि पाठराखण करीत आहात तेच साप उद्या तुमच्यावर विष ओकणार आहेत आणि तुमच्या पाठीवर लाथा घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन सत्याची बाजू घ्यावी.
त्याचबरोबर काही लोक असे आहेत की, जे मला आणि माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सामाजिक कार्याशी संपूर्ण परिचित आहेत परंतु त्यांची काय अडचण आहे मला माहिती नाही. पण सत्य माहिती असून सुद्धा सत्याची पाठराखण करण्यास पुढे येत नाहीत. कदाचित त्यांच्यावर धर्मसंकट आले असेल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असेल. पण त्यांनी लक्षात ठेवावे की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा आणि त्या अन्यायाला प्रोत्साहन देणारा व अन्याय दिसत असताना सुधा गप्प बसणार सर्वात जास्त दोषी असतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात का असत्याच्या.
शेवटी मला सर्व परिचिताना आणि दक्ष सत्यरक्षकांना एवढेच सांगायचे आहे की, हीच वेळ आहे सत्याचा विजय करण्याची. आज या सत्याला सर्वांची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार असून सर्व सत्यरक्षकांनी या लढाईत सामील व्हावे. त्याचबरोबर जे गोर गरीब लोक अश्या गावगुंडांच्या धमक्या व राजकीय दबावाखाली वावरत आहेत त्यांनी पुढे यावे आम्ही तुम्हाला मदत करू. अन्याय तिथे संघर्ष हेच ब्रीद समाजसेवा हाच धर्म याबरोबर यापुढे शिवशक्तीचे असेल.
आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
अध्यक्ष, शिवशक्ती समूह
#IsupportGm
बदनामीचे षडयंत्र : सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।
काल, परवा आणि रोज मला खूप लोक भेटत आहेत आणि रोज सहानुभूती आणि झालेल्या प्रकाराबद्दल राग व्यक्त करीत आहेत. हे सर्व स्वाभाविक आहे. काहीजण मी अडकलो हे ऐकून क्षणिक आनंद घेत आहेत. मला त्यांना आनंदी बघून खूप आनंद होत आहे. त्यांना आनंदी केल्याने माझ्या पुण्यात आणखी भर पडणार आहे हे निश्चित. आणि काहीजण सगळे काही माहिती असून गप्प आहेत, षंढ झाले आहेत. का माहिती नाही? असो ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. मग काहीजण कायदेशीर प्रक्रियेवर नाराज होऊन सत्य कधी बाहेर येणार याची चौकशी करीत आहेत. कलियुग आहे, सत्याची उपेक्षा होत राहणार असे कायर विवेचन करीत आहेत.
सत्य हे सोन्यासारखे पवित्र आणि सुंदर असते. गटारीतील घाण निघायला वेळ जाणारच पण सोन-सत्य हे बाहेर निघणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. काहीजण झालेल्या बदनामीची काय असे विचारतायत. बदनाम वही होता है, जिनका बडा नाम होता है। त्यामूळे माझे नाव आणि कार्य आहे हे तरी सिद्ध होतंय. आणि एखाद्या अस्सल बेवड्याने चांगल्या व्यक्तीला शिव्या दिल्या तर त्याची बदनामी होत नसते असे काही बुजुर्ग व्यक्तींनी सांगितले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मते आहेत. त्यांना चिटकून राहा. विजय तुमचाच होईल. मला स्वतःला विजयी व्हायचे नाही अथवा कुणाला हरवायचे देखील नाही. फक्त सत्य जगासमोर यावे आणि सत्याचा विजय व्हावा यासाठी मी लढा देत आहे. ज्यांचा सत्यावर विश्वास नाही. ज्यांनी सत्याचा विजय कधी पहिला नाही. ज्यांचे दौर्बल्य ज्यांना खत आहे. अश्याना माझे एकच सांगणे आहे जरा धीर धरा सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।
आपलाच,
प्रमोद मांडवे
संस्थापक/अध्यक्ष । शिवशक्ती सोशल फाउंडेशन
#IsupportGm
Wednesday, 16 September 2015
हुमणी नियंत्रणाचे उपाय
हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. लागवडीपूर्वी जमिनीची तीन ते चार वेळा नांगरट करावी. भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त ऊस शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील हुमणीच्या अळ्या माराव्यात. शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. खुरपणी करताना मजुरांकडून अळ्या काढून माराव्यात. उसाची तोडणी केल्यानंतर शेत स्वच्छ करावे. त्यात खोडक्या, तणे राहू देऊ नयेत. पडीक जमिनीत मुख्यत्वे मे-ऑगस्ट महिन्यात गवताचे ढीग करावेत आणि सकाळी असे ढीग तपासून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी. शेतातील बांधही स्वच्छ ठेवावेत.
जैविकनियंत्रण
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
रासायनिक उपाय
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
हुमणी जून- जुलै महिन्यांत उसाबरो
बरच इतर पिकांची मुळे खाते, यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेतातील उसामध्ये, तसेच इतर पिकांमध्ये चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी 100 किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावी.
ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 0.3 टक्के दाणेदार कीटकनाशक, फिप्रोनिल 25 किलो प्रति हेक्टरी किंवा तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्टरी शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मिसळावे.
मोठ्या उसात जून ते ऑक्टोबर महिन्यात प्रवाही 20 टक्के क्लोरपायरिफॉस, पाच लिटर प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून सरीतून द्यावा
Tuesday, 15 September 2015
सोशल मिडिया- वाईस ऑफ वाईसलेस
फेसबुक, व्हाटस अॅप, गुगल आणि इंटरनेटच्या वापरामुळे जीवन अधिक सोपे व सोयीस्कर झाले आहे.
एका क्लिकवरती पैसे पाठवणे, बिल भरणे खरेदी करणे, मित्रांशी संभाषण करणे त्याचबरोबर सरकारी कामे जसे दाखले व नोकरीसाठी अर्ज करणे यामुळे वेळ व पैसा वाचण्यासाठी मदत होत आहे.परंतु काहीजण सोशल मिडिया आणि इंटरनेट वापरावर निर्बंध घाला. सोशल मिडिया बंद करा हे पुढच्या पीडिला धोकादायक आहे असा पोरकट कंगवा करीत आहेत. एका बाजूला विकास आणि जलद सेवा देण्याच्या गप्पा मारतात पण ते विसरतात कि इंटरनेट शिवाय हे अश्यक्य आहे. कोणतीही नवी संकल्पना आली कि तिचे जसे फायदे असतात
तेवढेच तोटे असतात. पण त्या संकल्पनेचा आपण कसा वापर करतो यावरती ती फायदेशीर कि तोट्याची
हे ठरते. अर्थात हे सर्व लोकांच्या द्रुष्टीकोनावर अवलंबून आहे. उदारणार्थ समजा कि
एका अंगरक्षकाला मालकाचे संरक्षण करण्यासाठी बंदूक दिली आहे. पण त्याने त्या बंदुकीचा
उपयोग लोकांना धमकावण्यासाठी अथवा मालकावरच केला तर त्या बंदुकीचा किंवा बंदूक निर्मात्याचा
दोष काय ?
वाहनांची निर्मिती लोकांचे
जीवन सोयीस्कर होण्यासाठी केली आहे. वाहनांचा मानवी जीवनात अतिशय महत्वाचा वाटा आहे. वाहने नसती तर काय होईल याची आपण कल्पना करू शकतो.
वाहन कशे चालवावे याचा निर्णय वाहकाच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून आहे. त्याच्या चुकीच्या
गाडी चालवण्याने अपघात झाला आणि निष्पापांचा बळी गेला याचा दोष वाहनाला अथवा वाहन निर्मात्याला
देणे योग्य नाही.
तसेच इंटरनेट व सोशल मिडियाच्या गैरवापराने
झालेल्या नुकसानीला इंटरनेट व सोशल मिडिया जबाबदार असू शकत नाही. अथवा त्यावरती निर्बंध
घालणे योग्य नाही. सोशल मिडियामुले अनेक फायदेदेखील होतात हे विसरून चालणार नाही.
अलीकडेच असे दिसून आले आहे कि, आयसीस सारखी जगाची डोकेदुखी झालेली आतंकवादी संघटना भारतातील तरुणांना
सोशल मिडिया आणि इंटरनेटद्वारे भडकावून त्यांना देशविरोधी आतंकवादी कारवाईस प्रवृत्त
करतात. यावरती सोशल मिडिया व इंटरनेटला दोष न देता असे प्रभोषक साहित्य देशात येवू
नयेत यासाठी इंटरनेट फिल्टर बसवणे गरजेचे आहे. शिस्त हि प्रशासनाचे माकडहाड आहे असे
म्हणतात. भारतासारखी सार्वभौम लोकशाही असणार्या देशात कायदे कठोर आहेत परंतु त्याची
अंमलबजावणी कर- णारी यंत्रणा
अतिशय कुमकुवत, भ्रष्टाचारी व वेळखाऊ असलेने यामध्ये साधा मच्छरसुधा सापडत नाही. पण सोशल मिडियाच्या वापरावरच निर्बंध घालून लोकशाही तत्वांची आणि अधिकारांची पायमल्लीच होईल. जे सर्वसामान्य लोक प्रिंट मिडिया व टीव्ही सारख्या माध्यमांपर्यंत पोहचू शकत नाहीत ते सार्वजनिक समस्या निवारणासाठी
सोशल मिडियाचा वापर करतात. त्यामुळे अश्या प्रकारचे निर्बंध घातले तर वाईस ऑफ वाईसलेस असलेल्या सोशल मीडियाच्या बचावासाठी सर्वसामान्य क्रांती करतील.
- प्रमोद मांडवे
Saturday, 12 September 2015
उसाला लागली दुष्काळाची हुमणी
पाऊस नसलेने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मर्यादित पाणीवापरासाठी शासनाने दुष्काळी भागात उस गाळप बंद करण्याचे संकेत दिले असताना आता हुमणी या किडीचा उस शेतीवर प्रादुर्भाव झालेने उस शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होत नाहीत. मान्सूनच्या मोसमात गेले तीन महिने कडक उन पडल्यामुळे खरीप पिकाबरोबर उसदेखील वळत चालला आहे. त्यातच हुमाणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.
गारपीट,अवकाळी पाऊस आणि आता दुष्काळ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान होत असताना हुमणीच्या प्रादुर्भावाने उसाच्या शेतीची अक्षरशः माती झाली आहे. शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालेने हुमणी सर्वत्र या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पाऊसच झाला नसलेने जमिनीमध्ये पाणी नाही त्यामुळे हुमणीला उसाचे क्षेत्र मेजवाणीसारखे पोखरायला मिळत आहे.
किटकनाशके व मेटारायस या बुरशीचा हुमणीवरती वापर करता येतो परंतु जोपर्यंत हुमणी किडा हे स्वतःहून खात नाही तोपर्यंत तो मारत नाही. त्यामुळे सध्यातरी हुमणीवरती सरकारी अथवा खाजगी कोणत्याही यंत्रणेकडे ठोस उपाय नाही. सुलतानी आणि अस्मानी अश्या दोन्ही संकटाना तोंड देणाऱ्या बाळीराजाची फुल नाही पण फुलाची पाखळीदेखील सुयोग्य नियोजन आणि उपाययोजनांच्या अभावी हिरावली जात आहे. यावरती शासनदरबारी त्वरित उपाय काढण्याची शेवटची आशा ठेवून शेतकरी दिवस पुढे ढकलत आहेत.
“ पाउस पडला नसलेने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. उसाला पाणी जास्त लागत असलेने दुष्काळी भागात उस गाळप बंद करणार असलेचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे उस पिकावरती हुमणी या किडीच्या प्रादुर्भावाने जळलेले उसाचे पिकाकडे पाहू शेतकऱ्याची दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे…
- प्रमोद मांडवे
पाऊस नसलेने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मर्यादित पाणीवापरासाठी शासनाने दुष्काळी भागात उस गाळप बंद करण्याचे संकेत दिले असताना आता हुमणी या किडीचा उस शेतीवर प्रादुर्भाव झालेने उस शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होत नाहीत. मान्सूनच्या मोसमात गेले तीन महिने कडक उन पडल्यामुळे खरीप पिकाबरोबर उसदेखील वळत चालला आहे. त्यातच हुमाणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.
गारपीट,अवकाळी पाऊस आणि आता दुष्काळ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान होत असताना हुमणीच्या प्रादुर्भावाने उसाच्या शेतीची अक्षरशः माती झाली आहे. शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालेने हुमणी सर्वत्र या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पाऊसच झाला नसलेने जमिनीमध्ये पाणी नाही त्यामुळे हुमणीला उसाचे क्षेत्र मेजवाणीसारखे पोखरायला मिळत आहे.
किटकनाशके व मेटारायस या बुरशीचा हुमणीवरती वापर करता येतो परंतु जोपर्यंत हुमणी किडा हे स्वतःहून खात नाही तोपर्यंत तो मारत नाही. त्यामुळे सध्यातरी हुमणीवरती सरकारी अथवा खाजगी कोणत्याही यंत्रणेकडे ठोस उपाय नाही. सुलतानी आणि अस्मानी अश्या दोन्ही संकटाना तोंड देणाऱ्या बाळीराजाची फुल नाही पण फुलाची पाखळीदेखील सुयोग्य नियोजन आणि उपाययोजनांच्या अभावी हिरावली जात आहे. यावरती शासनदरबारी त्वरित उपाय काढण्याची शेवटची आशा ठेवून शेतकरी दिवस पुढे ढकलत आहेत.
“ पाउस पडला नसलेने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. उसाला पाणी जास्त लागत असलेने दुष्काळी भागात उस गाळप बंद करणार असलेचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे उस पिकावरती हुमणी या किडीच्या प्रादुर्भावाने जळलेले उसाचे पिकाकडे पाहू शेतकऱ्याची दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे…
- प्रमोद मांडवे
Tags
2020
२०२० Dindarshika
amol
badnami
Bhagatsing
BHARATMATA
calender
dada
deshmukh
free
ganesh
humani
kadegaon
Khed
kumthe
LETTER
mandave
motherland
nagaon
pandharpur
phadtare
pramod
pramod mandave
Pune
Rajguru
Rajgurunagar
rokhthok
rokhthok pramod
Shahid
shivajinagar
shivajinagr
shivshakti
Sukhdev
who i am
winaybhang
अमोल
आडनाव
कुमठे
खेड
गणेश
दादा
दिनदर्शिका
देशमुख
नागांव
पत्र
पुणे
प्रमोद
फडतरे
बदनामी
भगतसिंग
भारतमाता
मांडवे
मी कोण आहे
मोफत
राजगुरुनगर
राजगुरू
विनयभंग
शहीद
शिवशक्ती
षड्यंत्र
सत्य
सुखदेव
हुमणी