The Philanthropist The Consultant The Socialist

Showing posts with label विनयभंग. Show all posts
Showing posts with label विनयभंग. Show all posts

Wednesday 3 October 2018


         बदनामीचे षडयंत्र : सत्यंम्, शिवम्, सुंदरम्                                                          

        नमस्कार दि.२४ रोजी माझ्या समर्थनार्थ व सत्य रक्षणासाठी आपण सर्व सहकारी मित्र, मार्गदर्शक व प्रियजनांनी राजकीय, सामाजिक विरोधाला न जुमानता मा. तहसीलदार व पी.आय यांना निवेदन देऊन सत्य तपासणीची मागणी केली व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आणि असे न झाल्यास अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यातून सामाजिक माणुसकीचे दर्शन होऊन ' सत्यमेव जयते ' सत्यंम् शिवंम्, सुंदरम् या  तत्वासाठी आपण सर्वांनी प्राणांची बाजी लावण्याची तयारी दर्शवली याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
         संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत. आपण सर्व निर्भीड आहात याची प्रचिती सर्वाना आली आहे. मला नेहमी ऐकवायस मिळते की, माणसे चांगली नाहीत, कलीयुग आहे. कलियुगात सत्याचा विजय होत नसतो. माझे मनही कधीकधी हे मानण्यास तयार होते. परंतु अश्यावेळी आपल्यासारखी माणसे देवदूतप्रमाणे येऊन माझे मनोबल वाढवत आहेत. जसजसे दिवस वाढत आहे तसतसे गाव, तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि काही जिल्ह्याबाहेरील लोकांनी मला उघड पाठिंबा सोशल मीडिया व टेलिफोन आदींच्या माध्यमातून जाहीर केला आहे. आणि फक्त पाठिंबाच नाही तर सत्यरक्षणसाठी पर्यायी घरदार सोडून रस्त्यावर येण्याची तयारी दर्शवली आहे. हे सहकार्य हे माझ्यासाठी फक्त बुडत्याला सहारा देणाऱ्या काडी एवढेच नसून अनमोल असे आभाळभर आहे. 
        नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प मी आपल्या सहकार्याने आयुष्यभर पाळणार असून शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य, गोर-गरीब यांच्या हक्कासाठी संघर्ष करन्याचा निग्रह मी केला आहे. आपल्या सर्वांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासाठी आणि मूलभूत हक्क यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने स्वच्छ नीतीमत्तेने सामाजिक लढा उभा करीत आहे. सत्यरक्षण आणि लोकशाही बळकटीकरण यासाठी आपण सर्व सत्यरक्षक चांगल्या विचाराच्या माणसांनी पुढील लढाईसाठी तयार राहावे व सत्यधर्मासाठी आपले योगदान द्यावे. 
      पुढील लढाईच्या सूचना योग्य वेळीस मिळतीलच. पण सत्याचा मार्ग हा कठीण असतो असे म्हणतात, त्यामुळे या मार्गावर चालताना खूप काटे असतात परंतु अंतिम विजय हा सत्याचाच होतो. त्यासाठी आपली एकी ही पुन्हा सत्यधर्म स्थापन करील अशी आशा करतो. पुनःश्च सर्वांचे आभार.
                                                                                             आपलाच,
                                                                                  प्रमोद महादेव मांडवे 
                                                                  संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती सोशल फाउंडेशन

#IsupportGm

तहसीलदार कडेगांव श्रीमती अर्चना शेटे यांना प्रमोद मांडवे यांच्यावरील गुन्हा मागे घेनेसाठी निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते.

पोलीस स्टेशन कडेगांव पोलीस अमलदार यांना निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा 


मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब
संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह 

बदनामीचे षडयंत्र : तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।


       एकजण काल परवा मला भेटला आणि आनंदात हसत-हसत म्हणाला, काय कोणत्या बाईचा हात धरला. मला खूप राग आला होता. पण संयम पाळणे गरजेचे आहे असे स्वतःच्याच मनाला भासवून मी शांत झालो. ज्यावेळी तुम्ही चूक केलेली नसते आणि तुम्ही चूक केली आहे असा खोटा प्रचार होऊ लागतो, त्यावेळी आपले मानसिक संतुलन ढळते आणि आपण भांडू लागतो. पण मी असे काही केले नाही. किंवा त्याला स्पष्टीकरणसुद्धा देत बसलो नाही. जो माणूस माझ्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांनी खूष होऊन विकृत आनंद घेत असेल तर त्याला स्पष्टीकरण देऊन आपली ताकद का व्यर्थ घालवायची. आणि तसाही तो असत्याचा पुजारी सत्याचा प्रचार कुठे करणार आहे.
      थोड्यावेळाने तो माणूस पुन्हा खोटी सहानुभूती दाखवत बोलला. विनयभंग- विनयभंग अशी बोंब सगळीकडे उठली आहे. खोटी सहानुभूती दाखवत पुन्हा म्हणाला, तू असे करू शकत नाहीस पण लोक बोलतायत. मी हसलो आणि मला गोबेल्स नीती आठवली. एखादं असत्य पुन्हा पुन्हा सातत्याने सांगत राहीले की हळूहळू लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. जे प्रत्यक्षात नाही ते आहे, असे सतत भासवून, लोकांच्या मनावर ठसवून जनमतावर प्रभाव टाकण्याचे तंत्र म्हणजे गोबेल्स नीती. सध्या ही नीती राबवून मला म्हणजेच प्रमोद मांडवे यांना बदनाम करणे हे सामाजिक कार्य काही लोकांनी हाती घेतले आहे याचा मला राग नाही तर आनंदच आहे. निदान रिकामटेकडे काहीतरी काम करतायत. पण हे काम सत्याच्या बाजूने केले असते तर आदर्शवत म्हणता आले असते.
     मी त्या माणसापुढे आनंदी चेहऱ्याने हसतच होतो. माझ्या निर्भीडपणामुळे तो थोडा बेचैन, नाराज झाला. मी असा खोटा आरोप होऊन सुद्धा शांत आहे, निवांत आहे, हसत-खेळत पुन्हा सामाजिक कामे हातात घेऊन कार्य करीत आहे, अश्या खोट्या आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही हे त्या माणसाच्या लक्षात आल्यावर त्याने चेहरा पाडला. एवढ्या अडचणीत सुद्धा तुमचं हसन हेच जगाच रडणं असतं. हे यावेळी माझ्या लक्षात आले. तुम्हाला जर कोणाला हरवायचे असेल तर तुमचा आनंद आणि तुमचे स्मित हास्य सर्वाना पराजित करू शकते. याचा प्रत्यक्ष धडा मला मिळाला.
       दिवसेंदिवस विरोधक आणि असत्याचे पुजारी वाढत असताना मी संघर्ष सोडला नाही. गोबेल्स नीती वापरून लोकांच्या मनात मी आणि माझ्या चरित्र्याविषयी शंका निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. पण माझी मानसिक ताकद वाढतच आहे. जे सत्य असतात त्यांचे मनोबल नेहमी उच्च असते. म्हणून माझ्या हितचिंतकांसाठी एक ओळ लिहावी वाटली.
तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।

                                                                              आपलाच
                                                                       प्रमोद महादेव मांडवे
                                                              संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समुह

#IsupportGm


बदनामीचे षडयंत्र : जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी...

        प्रमोद मांडवे वर खोटी विनायभंगाची केस केली आता तो आपल्या शरण येईल आणि मग पहिली केस माघारी घ्यायला लावायची आणि मगच विनायभंगाची केस मागे घेऊ. आता तू अडकलास तुला कमीतकमी 10 वर्षाची शिक्षा होईल. आता प्रमोद मांडवेचा माज जीरला. अश्या काल्पनिक सुखाने काहीजण विकृत मानसिक आनंद घेत आहेत. त्यांना मला सांगावयाचे आहे तुमची सगळी राजकीय ताकद मला अडकविण्यासाठी वापरली. खोटे नाटे करून माझ्यावर निर्लजपणाच्यापुढे जाऊन आरोप लावले. मला अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून आणि खोटी केस दाखल करावी यासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना राजकीय दृष्ट्या वेठीस धरले. तरीसुद्धा सत्य लपले नाही. तुम्ही तुमच्या नेतमंडळींना मला हरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यानिपन पुरेपूर प्रयत्न केले. पण तरीसुद्धा मी तुम्हाला घाबरत नाही. यावरून मी तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या तोडीचा आहे. असे मी किंवा इतर कोणीही म्हणत नाही तर ते तुम्हीच सिद्ध केले आहे.
        आणि तुमचा असा गैरसमज असेल की मी विनयभंगाच्या खोट्या केसमधून सुटण्यासाठी माघार घेईन. हे तुमचे दिवास्वप्न आहे कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही। सत्य बाहेर येईलच आणि तरीसुद्धा तुमच्या कपटी बुद्धीने आणि सत्तेच्या मस्तीने माझ्यावर कटकारस्थान केलेच तर मी माझ्या मनाची अशी तयारी केली आहे की, सत्य रक्षणासाठी माझा बळी गेला तरी चालेल. मला खोट्या आरोपात संघर्ष करावा लागला तरी चालेल. मला बदनामी आणि त्रास, त्याग सहन करावा लागला तरी चालेल. मला स्वतः ला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली तरी चालेल. पण मी सत्यासाठी काहीही तडजोड करणार नाही. आणि हो ज्यांच्या प्रेरणेने मी जीवन जगतो आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, नेल्सन मंडेला, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही खोट्या आरोपात षडयंत्र आणि कटकारस्थानात बदनामी आणि शिक्षा सहन करावी लागली आहे. त्यांच्यापुढे मी काय गौण आहे. त्यांच्या एक टक्के फक्त मला सहन करावयाचे आहे. यासाठी या सर्व महापुरुषांनी मला आशीर्वाद दिला आहे.
      काही राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली हे सर्व घडत आहे याची माहिती सर्वांना आहेच. त्यामुळे त्यांची सर्व पिलावळ मी पराजित होण्याची वाट पाहत आहेत. काही तत्त्ववेत्ते म्हणतात, जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी तुमचा व सत्याचा विजय सर्वात आनंद देणारा असतो. अश्या राजकीय नेत्यांना मला सांगावयाचे आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी कधीही तुमच्या वाटेला आलो नाही. पण तुम्हाला मी करत असलेले समाजकार्य आवडत नसेल तर तुम्हीपण फक्त राजकारण न करता, स्वार्थ न ठेवता माझ्यापेक्षा जास्त समाजकार्य करू शकता. यासाठी कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण तुमच्या गावगुंडांना पाठीशी घालणासाठी स्त्रीच्या अब्रूची काळजी न करता अशी खोटी केस करण्याच्या संकल्पनेला ' बुळगापणा ' असेच म्हणावे लागेल. असले कुटील उद्योग करण्यापेक्षा हिम्मत असेल तर समाजकार्य करा आणि गोरगरीब जनतेला न्याय द्या. तुम्ही लवकर सुधारा, स्वतःत बदल घडवा नाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच.
                                                                             आपलाच,
                                                                   प्रमोद महादेव मांडवे
                                                           संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह

#IsupportGm



    बदनामीचे षडयंत्र : सत्यमेव जयते 

      नमस्कार मी प्रमोद महादेव मांडवे. माझी आणि तुमची प्रत्यक्ष ओळख नसली तरी शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखत असाल अशी आशा करतो. गेले काही दिवस हे माझ्या आयुष्यातील वाईट नाही तर संघर्षमय व अधिक ऊर्जा निर्माण करणारे दिवस आहेत. आणि संघर्ष करायला मला खूप आवडत. तसेच संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पूजलाय. असो, हा लेख बनविण्याचा उद्देश एवढाच की काही लोक माझा भाऊ गणेश मांडवे याला दि. ६ रोजी काही गावगुंडांनी केलेल्या मारहाणीतून लक्ष विचलित व्हावे या उद्देशाने फेसबुक, व्हॉट्स अप व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या तथाकथित आई-बहिणींची इज्जत लुटली असा खोटा कंगवा करून आम्हाला बदनाम करण्यासाठी झटत आहेत. त्यांची लायकी, कार्य आणि चरित्र संपूर्ण तालुक्याला माहिती आहेच. पण वास्तविक तेच द्विधा मनस्थिती आहेत. कारण आधी ते माझा भाऊ गणेश मांडवे याने त्यांच्या काल्पनिक आई- बहिणींची इज्जत लुटली असे सांगत होते. आता मी प्रमोद मांडवे यांनी त्यांच्या काल्पनिक आई-बहिणीचा विनयभंग केला अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. यामागचा त्यांचा हेतू एव्हढाच आहे की, गणेश मांडवे याला झालेल्या मारहाणीची तक्रार मागे घ्यावी. आणि आमची बदनामी करावी. हे बदनामीचे षडयंत्र काही राजकीय मंडळी आणि गुंडांच्या सहकार्याने केले जात आहे.         
          पण महान तत्त्ववेत्ते म्हणतात, एखाद्या अस्सल बेवड्याने अथवा वेड्याने चांगल्या माणसाला शिव्या दिल्या अथवा खोटे आरोप केले तर त्याची बदनामी होत नाही. असो मी याविषयी कायदेशीर लढाई लढतच आहे. असे कटकारस्थान मीही करू शकतो पण मी सत्यवादी मनुष्य असून माझे कुटुंब खानदानी आणि सुसंस्कृत आहे.असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही एकतरी पुरावा तुमच्या आई-बहीनीची इज्जत लुटल्याच्या अथवा विनयभंग केल्याचा द्यावा. आम्ही स्वतः अग्निकुंडात उडी मारून आमची पवित्रता सिद्ध करू. अश्या खोटे आरोप करणाऱ्यांनी आपल्याच घरातील आई-बहनिची इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून दुसऱ्यावर निराधार आरोप करण्यापेक्षा आपल्या चुकांचे प्रायश्चित्त कसे करावे याचा विचार करावा. परंतु यामध्ये विशेष वाटते ते राजकीय व्यक्तींचे आणि मान्यवरांचे. काही राजकीय व्यक्ती गणेश मांडवे यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना आणि माझ्यावर खोटे विनायभंगाचे आरोप लावणाऱ्या महिलेला सहकार्य करीत आहेत. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ज्या सापांना तुम्ही आज दूध पाजताय आणि ज्यांची तुम्हि पाठराखण करीत आहात तेच साप उद्या तुमच्यावर विष ओकणार आहेत आणि तुमच्या पाठीवर लाथा घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन सत्याची बाजू घ्यावी.
      त्याचबरोबर काही लोक असे आहेत की, जे मला आणि माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सामाजिक कार्याशी संपूर्ण परिचित आहेत परंतु त्यांची काय अडचण आहे मला माहिती नाही. पण सत्य माहिती असून सुद्धा सत्याची पाठराखण करण्यास पुढे येत नाहीत. कदाचित त्यांच्यावर धर्मसंकट आले असेल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असेल. पण त्यांनी लक्षात ठेवावे की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा आणि त्या अन्यायाला प्रोत्साहन देणारा व अन्याय दिसत असताना सुधा गप्प बसणार सर्वात जास्त दोषी असतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात का असत्याच्या.
      शेवटी मला सर्व परिचिताना आणि दक्ष सत्यरक्षकांना एवढेच सांगायचे आहे की, हीच वेळ आहे सत्याचा विजय करण्याची. आज या सत्याला सर्वांची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार असून सर्व सत्यरक्षकांनी या लढाईत सामील व्हावे. त्याचबरोबर जे गोर गरीब लोक अश्या गावगुंडांच्या धमक्या व राजकीय दबावाखाली वावरत आहेत त्यांनी पुढे यावे आम्ही तुम्हाला मदत करू. अन्याय तिथे संघर्ष हेच ब्रीद समाजसेवा हाच धर्म याबरोबर यापुढे शिवशक्तीचे असेल.
                                                                             
                                                                                                    आपलाच,
                                                                                       प्रमोद महादेव मांडवे
                                                                                   अध्यक्ष, शिवशक्ती समूह 

#IsupportGm

 

बदनामीचे षडयंत्र : सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।

       काल, परवा आणि रोज मला खूप लोक भेटत आहेत आणि रोज सहानुभूती आणि झालेल्या प्रकाराबद्दल राग व्यक्त करीत आहेत. हे सर्व स्वाभाविक आहे. काहीजण मी अडकलो हे ऐकून क्षणिक आनंद घेत आहेत. मला त्यांना आनंदी बघून खूप आनंद होत आहे. त्यांना आनंदी केल्याने माझ्या पुण्यात आणखी भर पडणार आहे हे निश्चित. आणि काहीजण सगळे काही माहिती असून गप्प आहेत, षंढ झाले आहेत. का माहिती नाही? असो ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. मग काहीजण कायदेशीर प्रक्रियेवर नाराज होऊन सत्य कधी बाहेर येणार याची चौकशी करीत आहेत. कलियुग आहे, सत्याची उपेक्षा होत राहणार असे कायर विवेचन करीत आहेत.
      सत्य हे सोन्यासारखे पवित्र आणि सुंदर असते. गटारीतील घाण निघायला वेळ जाणारच पण सोन-सत्य हे बाहेर निघणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. काहीजण झालेल्या बदनामीची काय असे विचारतायत. बदनाम वही होता है, जिनका बडा नाम होता है। त्यामूळे माझे नाव आणि कार्य आहे हे तरी सिद्ध होतंय. आणि एखाद्या अस्सल बेवड्याने चांगल्या व्यक्तीला शिव्या दिल्या तर त्याची बदनामी होत नसते असे काही बुजुर्ग व्यक्तींनी सांगितले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मते आहेत. त्यांना चिटकून राहा. विजय तुमचाच होईल. मला स्वतःला विजयी व्हायचे नाही अथवा कुणाला हरवायचे देखील नाही. फक्त सत्य जगासमोर यावे आणि सत्याचा विजय व्हावा यासाठी मी लढा देत आहे. ज्यांचा सत्यावर विश्वास नाही. ज्यांनी सत्याचा विजय कधी पहिला नाही. ज्यांचे दौर्बल्य ज्यांना खत आहे. अश्याना माझे एकच सांगणे आहे जरा धीर धरा सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।
                                   
                                                                               आपलाच,
                                                                            प्रमोद मांडवे
                                                   संस्थापक/अध्यक्ष । शिवशक्ती सोशल फाउंडेशन

#IsupportGm