The Philanthropist The Consultant The Socialist
Wednesday, 10 October 2018
तुमचं हसणं हे तुमच्या विरोधकांचा रडगाणं असत असे म्हणतात. अडचणीतसुद्धा हसणं आणि हसवत राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला सर्वसमावेशक, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणावे. अमोल दादा असाच सर्वांचा लाडका अजातशत्रू स्वभावाचा व्यक्ती. त्याचा स्मितभाषी चेहरा सर्वकाही सांगून जातो. माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. पण तो आणि मी माझ्या लहानपणी पासूनच खास मित्रांप्रमाणे एकत्र जिवाभावाचे आहे. त्यामुळे माझे गुपित त्याला आणि त्याचे मला माहिती आहे. त्यामुळे एकमेकांची उणि-धुनी काढण्यापेक्षा तह करून आम्ही दोघे मार्गक्रमण करत असतो. सुख असो दुःख असो माझी सावली बनून भक्कमपणे जसा हिमालय उभा आहे तसा अमोलदादा माझ्या पाठीमागे उभा आहे. त्याच्या सहवासात मला कशाचीच भीती वाटत नाही.
२०११/१२ साली आमचा एम.आय.डी. सी. आणि महसूल प्रशासन यांच्याविरोधात संघर्ष चालू होता. मी पहिल्यांदाच चळवळीत शिरलो होतो. मला जमीन, कायदे आणि प्रशासन प्रक्रिया यांचे शून्य ज्ञान होते. अश्यावेळी प्रशासनाच्या विरोधात लढताना माझी पळती भुई थोडी झाली होती. आणि माझ्याबरोबर माणसेही कमी होती. कमी नाही तर कोणीच न्हवतं. आम्ही उद्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार होतो. त्यासाठी प्रशासनाच्या परवानग्या, मंडप व्यवस्था आणि सर्व कार्ये आम्हाला करायची होती. मला खूप टेन्शन येत होते. अमोलदादा मात्र निवांत होता. सर्व कामे पाहत होता. रात्री दोन वाजले तरी आम्ही कडेगाव मध्ये मंडप घालत होतो. पोलीस हे प्रशासनाच्या बाजूने होते. त्यामुळे आम्हाला धमकावने आणि भीती घालणे हि कुटकामे सुपारी घेऊन पोलीस करत होते. मला भीतीही वाटायची पण अश्यावेळी अमोल दादा या सर्व अडचणींना सामोरे जायचा. त्यांच्याशी, त्यांची स्मितभाषी, गोडबोल्या स्वभावातून समजूत घालत होता. आणि शेवटी नाहीच ऐकले तर अस्सल क्षत्रिय भाषेत सुनावत होता. मग पोलिसांशी वादही झाला.
खरंतर आम्ही सर्व एकसारखेच होतो. जास्त काही फरक नाही. आमचे खानदान सर्वसामान्य आणि प्रशासनाच्या अन्यायात दबून बसलेलं होत. त्यामुळे भांडण-तंटा-वाद याची जास्त सवय आमच्या युवा पीढिला न्हवती. त्यातच पूर्वीच्या भांडण-तंट्यात घरदार होरपळले होतं. त्यामुळे आमच्या घरातील मोठे लोक असे आंदोलन आणि प्रशासन यांना भीत होते. त्यारात्री आमचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर अमोल दादा ने पोलिसांना चांगलेच सुनावले. मी खूप भ्यायलो होतो. मी अमोल दादा ला विचारले तुला पोलिसांची भीती वाटत नाही काय? अमोल दादा मला म्हणाला तू असल्यावर मला कुणाचीच भीती वाटत नाही. तू असल्यावर पोलिसच काय मंत्र्यांच्या कॉलरला मी हात लावीन. असे आम्ही दोघेजण एकसारखेच पण एकमेकांची शक्ती होतो. त्याला कोण काही बोललं तर जरी मी शरीराने मध्यम असलो तरी माझ्या अंगात सोळा सहस्त्र हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत. आणि मी भिडतो. असे आम्ही सर्व शिवशक्तीच्या शिलेदारांनी आपल्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी " शिवशक्ती " ची स्थापन केली. यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा अमोलदादाचा आहे. आपल्यात जे कलागुण आहेत. त्याचा उपयोग सामजिक कार्यासाठी करण्याची कला अमोल दादाला जन्मजातच आहे असे मला वाटते. प्रत्येक कार्यात सर्वाना सामावून घेण्याची वृत्ती त्याच्यात जन्मजातच होती. त्यामुळे लहान असो वा थोर सगळ्यांशी त्याचे चांगले संबंध आहेत. प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार योग्य वैचारिक औषध देण्यामध्ये त्याचा हातकंडा आहे.
शेती, स्वतःचा टूर्सचा व्यवसाय आणि कुटुंब अशी मल्टिटास्किंग कामे अमोलदादा कडून शिकावीत. व्यवसायात तर पक्का गुजराती-मारवाडी असल्यासारखा आहे. त्याच्या या गुणांचा उपयोग आम्ही कोणताही व्यवहार करणे अथवा खरेदी करताना करतो. कारण तो आमच्यापेक्षा जास्त नफा मिळवूनच देतो. हा त्याचा चेंगूस नाही तर सजग स्वभाव गुण जो आमच्यात नाही तो त्याच्यात आहे. आमच्या सर्व शिवशक्तीच्या शिलेदारांच्या मनगटाची ताकद अमोलदादा आहे. आमची सर्वांची हीच एकी लोकांच्या नजरेत येते आणि मग आम्हाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न चालू होतो. पण अशा वेळी अमोल दादाच असतो जो सर्वांना जोडून ठेवतो. आपल्याकडे पुन्हा ओढून घेतो. त्यामुळे त्याला शिवशक्तीचा चुंबक म्हंटले तरी चालेल.
शिवशक्ती फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमांबरोबर येणाऱ्या काळात ' शिवशक्ती संचलित कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ' च्या व्यवस्थापनाची जबादारीपण अमोल दादाच्या खांद्यावर आहे. तो ही जबादारी त्याच्या व्यवसाय कौशल्याच्या जोरावर निश्चितपणे निभावेल असा आमचा विश्वास आहे.अश्या या निर्भीड, कर्तृत्ववान, दृष्ट्या व मनमिळाऊ भावाला महादेवाच्या त्रिनेत्रातील शक्ती, छत्रपती शिवरायांच्या तलवारीची ताकद, स्वामीजींचे आचार-विचार, भगतसिंग-सुखदेव-राजगुरू-चंद्रशेखर आझाद यांचा दृढ आत्मविश्वास, लोकमान्य टिळकांसारखा संयम, सावरकरांतील त्याग, नेताजी सुभाषबाबूंप्रमाणे राष्ट्रभक्ती, डॉ. आंबेडकरांतील तत्परता अमोल दादांना सतत लाभो हीच या वाढदिनी ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा.
शिवशक्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
Tags
2020
२०२० Dindarshika
amol
badnami
Bhagatsing
BHARATMATA
calender
dada
deshmukh
free
ganesh
humani
kadegaon
Khed
kumthe
LETTER
mandave
motherland
nagaon
pandharpur
phadtare
pramod
pramod mandave
Pune
Rajguru
Rajgurunagar
rokhthok
rokhthok pramod
Shahid
shivajinagar
shivajinagr
shivshakti
Sukhdev
who i am
winaybhang
अमोल
आडनाव
कुमठे
खेड
गणेश
दादा
दिनदर्शिका
देशमुख
नागांव
पत्र
पुणे
प्रमोद
फडतरे
बदनामी
भगतसिंग
भारतमाता
मांडवे
मी कोण आहे
मोफत
राजगुरुनगर
राजगुरू
विनयभंग
शहीद
शिवशक्ती
षड्यंत्र
सत्य
सुखदेव
हुमणी
No comments:
Post a Comment