The Philanthropist The Consultant The Socialist

Wednesday, 3 October 2018

बदनामीचे षडयंत्र : सत्यमेव जयते ।



    बदनामीचे षडयंत्र : सत्यमेव जयते 

      नमस्कार मी प्रमोद महादेव मांडवे. माझी आणि तुमची प्रत्यक्ष ओळख नसली तरी शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखत असाल अशी आशा करतो. गेले काही दिवस हे माझ्या आयुष्यातील वाईट नाही तर संघर्षमय व अधिक ऊर्जा निर्माण करणारे दिवस आहेत. आणि संघर्ष करायला मला खूप आवडत. तसेच संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पूजलाय. असो, हा लेख बनविण्याचा उद्देश एवढाच की काही लोक माझा भाऊ गणेश मांडवे याला दि. ६ रोजी काही गावगुंडांनी केलेल्या मारहाणीतून लक्ष विचलित व्हावे या उद्देशाने फेसबुक, व्हॉट्स अप व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या तथाकथित आई-बहिणींची इज्जत लुटली असा खोटा कंगवा करून आम्हाला बदनाम करण्यासाठी झटत आहेत. त्यांची लायकी, कार्य आणि चरित्र संपूर्ण तालुक्याला माहिती आहेच. पण वास्तविक तेच द्विधा मनस्थिती आहेत. कारण आधी ते माझा भाऊ गणेश मांडवे याने त्यांच्या काल्पनिक आई- बहिणींची इज्जत लुटली असे सांगत होते. आता मी प्रमोद मांडवे यांनी त्यांच्या काल्पनिक आई-बहिणीचा विनयभंग केला अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. यामागचा त्यांचा हेतू एव्हढाच आहे की, गणेश मांडवे याला झालेल्या मारहाणीची तक्रार मागे घ्यावी. आणि आमची बदनामी करावी. हे बदनामीचे षडयंत्र काही राजकीय मंडळी आणि गुंडांच्या सहकार्याने केले जात आहे.         
          पण महान तत्त्ववेत्ते म्हणतात, एखाद्या अस्सल बेवड्याने अथवा वेड्याने चांगल्या माणसाला शिव्या दिल्या अथवा खोटे आरोप केले तर त्याची बदनामी होत नाही. असो मी याविषयी कायदेशीर लढाई लढतच आहे. असे कटकारस्थान मीही करू शकतो पण मी सत्यवादी मनुष्य असून माझे कुटुंब खानदानी आणि सुसंस्कृत आहे.असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही एकतरी पुरावा तुमच्या आई-बहीनीची इज्जत लुटल्याच्या अथवा विनयभंग केल्याचा द्यावा. आम्ही स्वतः अग्निकुंडात उडी मारून आमची पवित्रता सिद्ध करू. अश्या खोटे आरोप करणाऱ्यांनी आपल्याच घरातील आई-बहनिची इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून दुसऱ्यावर निराधार आरोप करण्यापेक्षा आपल्या चुकांचे प्रायश्चित्त कसे करावे याचा विचार करावा. परंतु यामध्ये विशेष वाटते ते राजकीय व्यक्तींचे आणि मान्यवरांचे. काही राजकीय व्यक्ती गणेश मांडवे यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना आणि माझ्यावर खोटे विनायभंगाचे आरोप लावणाऱ्या महिलेला सहकार्य करीत आहेत. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ज्या सापांना तुम्ही आज दूध पाजताय आणि ज्यांची तुम्हि पाठराखण करीत आहात तेच साप उद्या तुमच्यावर विष ओकणार आहेत आणि तुमच्या पाठीवर लाथा घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन सत्याची बाजू घ्यावी.
      त्याचबरोबर काही लोक असे आहेत की, जे मला आणि माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सामाजिक कार्याशी संपूर्ण परिचित आहेत परंतु त्यांची काय अडचण आहे मला माहिती नाही. पण सत्य माहिती असून सुद्धा सत्याची पाठराखण करण्यास पुढे येत नाहीत. कदाचित त्यांच्यावर धर्मसंकट आले असेल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असेल. पण त्यांनी लक्षात ठेवावे की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा आणि त्या अन्यायाला प्रोत्साहन देणारा व अन्याय दिसत असताना सुधा गप्प बसणार सर्वात जास्त दोषी असतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात का असत्याच्या.
      शेवटी मला सर्व परिचिताना आणि दक्ष सत्यरक्षकांना एवढेच सांगायचे आहे की, हीच वेळ आहे सत्याचा विजय करण्याची. आज या सत्याला सर्वांची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार असून सर्व सत्यरक्षकांनी या लढाईत सामील व्हावे. त्याचबरोबर जे गोर गरीब लोक अश्या गावगुंडांच्या धमक्या व राजकीय दबावाखाली वावरत आहेत त्यांनी पुढे यावे आम्ही तुम्हाला मदत करू. अन्याय तिथे संघर्ष हेच ब्रीद समाजसेवा हाच धर्म याबरोबर यापुढे शिवशक्तीचे असेल.
                                                                             
                                                                                                    आपलाच,
                                                                                       प्रमोद महादेव मांडवे
                                                                                   अध्यक्ष, शिवशक्ती समूह 

#IsupportGm

No comments:

Post a Comment