The Philanthropist The Consultant The Socialist

Showing posts with label rokhthok. Show all posts
Showing posts with label rokhthok. Show all posts

Wednesday, 3 October 2018


         बदनामीचे षडयंत्र : सत्यंम्, शिवम्, सुंदरम्                                                          

        नमस्कार दि.२४ रोजी माझ्या समर्थनार्थ व सत्य रक्षणासाठी आपण सर्व सहकारी मित्र, मार्गदर्शक व प्रियजनांनी राजकीय, सामाजिक विरोधाला न जुमानता मा. तहसीलदार व पी.आय यांना निवेदन देऊन सत्य तपासणीची मागणी केली व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आणि असे न झाल्यास अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यातून सामाजिक माणुसकीचे दर्शन होऊन ' सत्यमेव जयते ' सत्यंम् शिवंम्, सुंदरम् या  तत्वासाठी आपण सर्वांनी प्राणांची बाजी लावण्याची तयारी दर्शवली याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
         संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत. आपण सर्व निर्भीड आहात याची प्रचिती सर्वाना आली आहे. मला नेहमी ऐकवायस मिळते की, माणसे चांगली नाहीत, कलीयुग आहे. कलियुगात सत्याचा विजय होत नसतो. माझे मनही कधीकधी हे मानण्यास तयार होते. परंतु अश्यावेळी आपल्यासारखी माणसे देवदूतप्रमाणे येऊन माझे मनोबल वाढवत आहेत. जसजसे दिवस वाढत आहे तसतसे गाव, तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि काही जिल्ह्याबाहेरील लोकांनी मला उघड पाठिंबा सोशल मीडिया व टेलिफोन आदींच्या माध्यमातून जाहीर केला आहे. आणि फक्त पाठिंबाच नाही तर सत्यरक्षणसाठी पर्यायी घरदार सोडून रस्त्यावर येण्याची तयारी दर्शवली आहे. हे सहकार्य हे माझ्यासाठी फक्त बुडत्याला सहारा देणाऱ्या काडी एवढेच नसून अनमोल असे आभाळभर आहे. 
        नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प मी आपल्या सहकार्याने आयुष्यभर पाळणार असून शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य, गोर-गरीब यांच्या हक्कासाठी संघर्ष करन्याचा निग्रह मी केला आहे. आपल्या सर्वांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासाठी आणि मूलभूत हक्क यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने स्वच्छ नीतीमत्तेने सामाजिक लढा उभा करीत आहे. सत्यरक्षण आणि लोकशाही बळकटीकरण यासाठी आपण सर्व सत्यरक्षक चांगल्या विचाराच्या माणसांनी पुढील लढाईसाठी तयार राहावे व सत्यधर्मासाठी आपले योगदान द्यावे. 
      पुढील लढाईच्या सूचना योग्य वेळीस मिळतीलच. पण सत्याचा मार्ग हा कठीण असतो असे म्हणतात, त्यामुळे या मार्गावर चालताना खूप काटे असतात परंतु अंतिम विजय हा सत्याचाच होतो. त्यासाठी आपली एकी ही पुन्हा सत्यधर्म स्थापन करील अशी आशा करतो. पुनःश्च सर्वांचे आभार.
                                                                                             आपलाच,
                                                                                  प्रमोद महादेव मांडवे 
                                                                  संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती सोशल फाउंडेशन

#IsupportGm

तहसीलदार कडेगांव श्रीमती अर्चना शेटे यांना प्रमोद मांडवे यांच्यावरील गुन्हा मागे घेनेसाठी निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते.

पोलीस स्टेशन कडेगांव पोलीस अमलदार यांना निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा 

Wednesday, 16 September 2015

humani
हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. लागवडीपूर्वी जमिनीची तीन ते चार वेळा नांगरट करावी. भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त ऊस शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील हुमणीच्या अळ्या माराव्यात. शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. खुरपणी करताना मजुरांकडून अळ्या काढून माराव्यात. उसाची तोडणी केल्यानंतर शेत स्वच्छ करावे. त्यात खोडक्‍या, तणे राहू देऊ नयेत. पडीक जमिनीत मुख्यत्वे मे-ऑगस्ट महिन्यात गवताचे ढीग करावेत आणि सकाळी असे ढीग तपासून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी. शेतातील बांधही स्वच्छ ठेवावेत.
जैविकनियंत्रण 
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
रासायनिक उपाय
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
हुमणी जून- जुलै महिन्यांत उसाबरो
बरच इतर पिकांची मुळे खाते, यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेतातील उसामध्ये, तसेच इतर पिकांमध्ये चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी 100 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावी.
ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात 0.3 टक्के दाणेदार कीटकनाशक, फिप्रोनिल 25 किलो प्रति हेक्‍टरी किंवा तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्‍टरी शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मिसळावे.
मोठ्या उसात जून ते ऑक्‍टोबर महिन्यात प्रवाही 20 टक्के क्‍लोरपायरिफॉस, पाच लिटर प्रति हेक्‍टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून सरीतून द्यावा