The Philanthropist The Consultant The Socialist

Wednesday, 24 July 2019

इतिहास आडनावाचा : मांडवे (फडतरे-देशमुख)

 

इतिहास आडनावाचा : मांडवे (फडतरे-देशमुख)

       मराठा समाज हा ९६ कुळे एकत्र येऊन त्यांच्या संयोगाने निर्माण झालेला लढवय्या क्षत्रिय समाज आहे. यामध्ये काही आडनावे म्हणजे जसे देशमुख, पाटील हि आडनावे नसून ह्या इतिहास काळातील राजे-महाराजे यांचेकडून त्यांच्या पराक्रमाबद्दल दिलेल्या पदव्या आहेत. त्याची नंतर आडनावे झाली. पैकी काही आडनावे हि आडनावे नसून ती पडनावे आहेत. मांडवे हे असेच पडनाव आहे. मांडवे आडनाव असणारे बहुतांशी लोक हे शिवाजीनगर ता. कडेगांव जिल्हा सांगली, नागांचे-कुमठे ता. खटाव जिल्हा सातारा, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे वास्तव्यास आहेत. शिवाजीनगर व नागांचे-कुमठे याठिकाणचे मांडवे हे मुळचे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील असून त्यांचे आडनाव हे फडतरे असे आहे. मुस्लिम राजवटीत मांडवे/फडतरे लोकांना पराक्रमाने देशमुख हि पदवी देशमुखी मिळाली. त्यानंतर त्यांचे आडनाव फडतरे-देशमुख असे पडले.

इसविसन ११२६ ला मुस्लीम मंत्र्यांनी ७ आणे खणणी (चावडी/महसूल) मुुुस्लिम राजवटीसाठी मागितला. सदर चावडी देण्यास फडतरे-देशमुखांनी नकार दिला. त्यावेळी मुुस्लिम सैनिक व देशमूख यांच्यात संघर्ष झाला. या संघर्ष काळात सन ११२६ ला काही फडतरे-देशमुख नागांचे-कुमठे येथे वास्तव्यास आले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात फडतरे-देशमुखांनी स्व:पराक्रमाने पाटीलकी मिळविली. तत्पूर्वी इसवीसन १४२६ ला
  काहीजण शिवाजीनगर (न्हावी) ता. कडेगांव जिल्हा सांगली येथे वास्तव्यास आले. ते शिवाजीनगरच्या जानाई मंदिराशेजारी ओढ्यालगत मांडव घालून राहिले. त्यामुळे लोक त्यांना मांडवे म्हणू लागले व पुढे जाऊन मांडवे हे आडनाव झाले. पैकी काहीजण नागांचे-कुमठे व पंढरपूर येथे माघारी गेले. सध्यस्थितीत शिवाजीनगर, नागांचे-कुमठे व पंढरपूर येथे त्यांची पिढी आढळून येते. शिवाजीनगर येथे मांडवे या आडनावाने, नागांचे-कुमठे येथे मांडवे तर पंढरपूर येथे मांडवे, फडतरे-देशमुख अशी आडनावे आहेत. 

 पंढरपूर जिल्हा सोलापूर, नागांचे कुमठे ता. खटाव जिल्हा सातारा व शिवाजीनगर ता, कडेगांव जिल्हा सांगली येथील मांडवे (फडतरे-देशमुख) आडनावाची माणसे संघर्षशील, न्यायप्रिय व तत्वनिष्ठ स्वभावाची असल्याची माहिती पूर्वज वंशावळवाले बाळू हेळवी यांनी सांगितली. सदर सर्व पिढ्यांची माहिती लिखित स्वरुपात सन ११०० पासून त्यांच्याजवळ आहे. शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांच्या बंधनात अडकलेली हि मंडळी आता ज्ञानगंगेत न्हाली असून अनेक मोठे अधिकारी, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात, देशसेवेत कार्यरत आहेत.

                                             संकलन : प्रमोद महादेव मांडवे (फडतरे-देशमुख)

                                             मुळमाहिती : पूर्वज वंशावळवाले बाळू हेळवी



4 comments:

  1. फोन नंबर लिहित चला म्हणजे संपर्क करता येतो..9422650044

    ReplyDelete
  2. आमचे आडनाव भोसले आहे आमचे कुलदैवत जोतिबा आहे आम्हाला आमच्या मुळ वंशाब्दल माहिती मिळेल का

    ReplyDelete
  3. फडतरे गेले कित्येक वर्ष , कित्येक पिढ्या पुरंदर येथे बोपगावं येथे राहत आहेत.

    ReplyDelete