The Philanthropist The Consultant The Socialist

Showing posts with label who i am. Show all posts
Showing posts with label who i am. Show all posts

Wednesday 3 October 2018

मी कोण आहे...

        मला ना कोणाचा राग आहे ना लोभ. माझी ना कोणाशी इर्षा आहे ना कोणाशी वैर. माझी जीवन जगण्याची पद्धत फक्त थोडी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, लो. टिळक, ने. सुभाषचंद्र बोस हे माझे आदर्श आहेत. समाजसेवा हाच माझा धर्म आणि संघर्ष हेच माझे कर्म आहे. जिथे अन्याय,अत्याचार दिसतो तिथे मी न्यायासाठी संघर्ष करतो. मला जे चांगले वाटते, ते मी करतो. काही लोक मला चांगले समजतात काही वाईट. मला तशी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. देवाला माहिती आहे माझा धर्माचा-सत्याचा मार्ग आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात मी कायम चकरा मारतो. कारण सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ सर्वसामान्य गरीब लोकांना मिळवून देऊ शकेन. माझ्या लोकांचे भले करू शकेन.
       माझ्याजवळ जात-धर्म, वंश, रंग, कुळ याला थारा नाही. ' ज्याचे कर्म स्वच्छ तोच उच्च ' असा माझा विचार आहे. लोक मला चुकीचे ठरवण्यात व्यस्त असतात. माझ्यावर याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही मला एकदा भेटा तेंव्हा समजेल मी कसा आहे. लोक काहीही म्हणोत माझे मन साफ आहे. मी माझ्यासाठी नाही जगत. मी जगतोय माझ्या लोकांसाठी, समाजासाठी, देशासाठी, गोर- गरिबांसाठी, जनसामान्यांच्या हक्कासाठी.
      " माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देने हाच आहे. जो समजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. " अशी माझी विचारधारा आहे. मी एक क्षत्रिय आहे, जो न्यायासाठी संघर्ष करतो. मी एक ब्राह्मण आहे, जो समाजाला शिक्षित करतो. मी एक वैश्य आहे, जो समाज संचलन करतो. मी एक क्षुद्र आहे, जो समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करतो. मी जन्माने क्षत्रिय आणि कर्माने क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण आहे. मी महादेवाचा- परमात्म्याचा एक अंश, एक आत्मा, एक मनुष्य आहे. मी प्रमोद मांडवे आहे.
                                                                       आपलाच,
                                                            प्रमोद महादेव मांडवे
                                                संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती सोशल फौंडेशन