The Philanthropist The Consultant The Socialist

Showing posts with label हुमणी. Show all posts
Showing posts with label हुमणी. Show all posts

Wednesday 16 September 2015

humani
हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. लागवडीपूर्वी जमिनीची तीन ते चार वेळा नांगरट करावी. भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त ऊस शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील हुमणीच्या अळ्या माराव्यात. शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. खुरपणी करताना मजुरांकडून अळ्या काढून माराव्यात. उसाची तोडणी केल्यानंतर शेत स्वच्छ करावे. त्यात खोडक्‍या, तणे राहू देऊ नयेत. पडीक जमिनीत मुख्यत्वे मे-ऑगस्ट महिन्यात गवताचे ढीग करावेत आणि सकाळी असे ढीग तपासून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी. शेतातील बांधही स्वच्छ ठेवावेत.
जैविकनियंत्रण 
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
रासायनिक उपाय
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
हुमणी जून- जुलै महिन्यांत उसाबरो
बरच इतर पिकांची मुळे खाते, यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेतातील उसामध्ये, तसेच इतर पिकांमध्ये चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी 100 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावी.
ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात 0.3 टक्के दाणेदार कीटकनाशक, फिप्रोनिल 25 किलो प्रति हेक्‍टरी किंवा तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्‍टरी शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मिसळावे.
मोठ्या उसात जून ते ऑक्‍टोबर महिन्यात प्रवाही 20 टक्के क्‍लोरपायरिफॉस, पाच लिटर प्रति हेक्‍टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून सरीतून द्यावा