मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब
|
The Philanthropist The Consultant The Socialist
Showing posts with label pramod mandave. Show all posts
Showing posts with label pramod mandave. Show all posts
Wednesday, 3 October 2018
एकजण काल परवा मला भेटला आणि आनंदात हसत-हसत म्हणाला, काय कोणत्या बाईचा हात धरला. मला खूप राग आला होता. पण संयम पाळणे गरजेचे आहे असे स्वतःच्याच मनाला भासवून मी शांत झालो. ज्यावेळी तुम्ही चूक केलेली नसते आणि तुम्ही चूक केली आहे असा खोटा प्रचार होऊ लागतो, त्यावेळी आपले मानसिक संतुलन ढळते आणि आपण भांडू लागतो. पण मी असे काही केले नाही. किंवा त्याला स्पष्टीकरणसुद्धा देत बसलो नाही. जो माणूस माझ्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांनी खूष होऊन विकृत आनंद घेत असेल तर त्याला स्पष्टीकरण देऊन आपली ताकद का व्यर्थ घालवायची. आणि तसाही तो असत्याचा पुजारी सत्याचा प्रचार कुठे करणार आहे.
थोड्यावेळाने तो माणूस पुन्हा खोटी सहानुभूती दाखवत बोलला. विनयभंग- विनयभंग अशी बोंब सगळीकडे उठली आहे. खोटी सहानुभूती दाखवत पुन्हा म्हणाला, तू असे करू शकत नाहीस पण लोक बोलतायत. मी हसलो आणि मला गोबेल्स नीती आठवली. एखादं असत्य पुन्हा पुन्हा सातत्याने सांगत राहीले की हळूहळू लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. जे प्रत्यक्षात नाही ते आहे, असे सतत भासवून, लोकांच्या मनावर ठसवून जनमतावर प्रभाव टाकण्याचे तंत्र म्हणजे गोबेल्स नीती. सध्या ही नीती राबवून मला म्हणजेच प्रमोद मांडवे यांना बदनाम करणे हे सामाजिक कार्य काही लोकांनी हाती घेतले आहे याचा मला राग नाही तर आनंदच आहे. निदान रिकामटेकडे काहीतरी काम करतायत. पण हे काम सत्याच्या बाजूने केले असते तर आदर्शवत म्हणता आले असते.
मी त्या माणसापुढे आनंदी चेहऱ्याने हसतच होतो. माझ्या निर्भीडपणामुळे तो थोडा बेचैन, नाराज झाला. मी असा खोटा आरोप होऊन सुद्धा शांत आहे, निवांत आहे, हसत-खेळत पुन्हा सामाजिक कामे हातात घेऊन कार्य करीत आहे, अश्या खोट्या आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही हे त्या माणसाच्या लक्षात आल्यावर त्याने चेहरा पाडला. एवढ्या अडचणीत सुद्धा तुमचं हसन हेच जगाच रडणं असतं. हे यावेळी माझ्या लक्षात आले. तुम्हाला जर कोणाला हरवायचे असेल तर तुमचा आनंद आणि तुमचे स्मित हास्य सर्वाना पराजित करू शकते. याचा प्रत्यक्ष धडा मला मिळाला.
दिवसेंदिवस विरोधक आणि असत्याचे पुजारी वाढत असताना मी संघर्ष सोडला नाही. गोबेल्स नीती वापरून लोकांच्या मनात मी आणि माझ्या चरित्र्याविषयी शंका निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. पण माझी मानसिक ताकद वाढतच आहे. जे सत्य असतात त्यांचे मनोबल नेहमी उच्च असते. म्हणून माझ्या हितचिंतकांसाठी एक ओळ लिहावी वाटली.
तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।
आपलाच
प्रमोद महादेव मांडवे
संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समुह
Labels:
ganesh,
mandave,
pramod,
pramod mandave,
shivshakti,
winaybhang,
गणेश,
प्रमोद,
बदनामी,
विनयभंग
Wednesday, 16 September 2015
हुमणी नियंत्रणाचे उपाय
हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. लागवडीपूर्वी जमिनीची तीन ते चार वेळा नांगरट करावी. भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त ऊस शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील हुमणीच्या अळ्या माराव्यात. शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. खुरपणी करताना मजुरांकडून अळ्या काढून माराव्यात. उसाची तोडणी केल्यानंतर शेत स्वच्छ करावे. त्यात खोडक्या, तणे राहू देऊ नयेत. पडीक जमिनीत मुख्यत्वे मे-ऑगस्ट महिन्यात गवताचे ढीग करावेत आणि सकाळी असे ढीग तपासून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी. शेतातील बांधही स्वच्छ ठेवावेत.
जैविकनियंत्रण
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
रासायनिक उपाय
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
हुमणी जून- जुलै महिन्यांत उसाबरो
बरच इतर पिकांची मुळे खाते, यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेतातील उसामध्ये, तसेच इतर पिकांमध्ये चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी 100 किलो प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावी.
ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 0.3 टक्के दाणेदार कीटकनाशक, फिप्रोनिल 25 किलो प्रति हेक्टरी किंवा तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्टरी शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मिसळावे.
मोठ्या उसात जून ते ऑक्टोबर महिन्यात प्रवाही 20 टक्के क्लोरपायरिफॉस, पाच लिटर प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून सरीतून द्यावा
Tags
2020
२०२० Dindarshika
amol
badnami
Bhagatsing
BHARATMATA
calender
dada
deshmukh
free
ganesh
humani
kadegaon
Khed
kumthe
LETTER
mandave
motherland
nagaon
pandharpur
phadtare
pramod
pramod mandave
Pune
Rajguru
Rajgurunagar
rokhthok
rokhthok pramod
Shahid
shivajinagar
shivajinagr
shivshakti
Sukhdev
who i am
winaybhang
अमोल
आडनाव
कुमठे
खेड
गणेश
दादा
दिनदर्शिका
देशमुख
नागांव
पत्र
पुणे
प्रमोद
फडतरे
बदनामी
भगतसिंग
भारतमाता
मांडवे
मी कोण आहे
मोफत
राजगुरुनगर
राजगुरू
विनयभंग
शहीद
शिवशक्ती
षड्यंत्र
सत्य
सुखदेव
हुमणी