The Philanthropist The Consultant The Socialist

Wednesday 3 October 2018

बदनामीचे षडयंत्र : जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी...


बदनामीचे षडयंत्र : जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी...

        प्रमोद मांडवे वर खोटी विनायभंगाची केस केली आता तो आपल्या शरण येईल आणि मग पहिली केस माघारी घ्यायला लावायची आणि मगच विनायभंगाची केस मागे घेऊ. आता तू अडकलास तुला कमीतकमी 10 वर्षाची शिक्षा होईल. आता प्रमोद मांडवेचा माज जीरला. अश्या काल्पनिक सुखाने काहीजण विकृत मानसिक आनंद घेत आहेत. त्यांना मला सांगावयाचे आहे तुमची सगळी राजकीय ताकद मला अडकविण्यासाठी वापरली. खोटे नाटे करून माझ्यावर निर्लजपणाच्यापुढे जाऊन आरोप लावले. मला अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून आणि खोटी केस दाखल करावी यासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना राजकीय दृष्ट्या वेठीस धरले. तरीसुद्धा सत्य लपले नाही. तुम्ही तुमच्या नेतमंडळींना मला हरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यानिपन पुरेपूर प्रयत्न केले. पण तरीसुद्धा मी तुम्हाला घाबरत नाही. यावरून मी तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या तोडीचा आहे. असे मी किंवा इतर कोणीही म्हणत नाही तर ते तुम्हीच सिद्ध केले आहे.
        आणि तुमचा असा गैरसमज असेल की मी विनयभंगाच्या खोट्या केसमधून सुटण्यासाठी माघार घेईन. हे तुमचे दिवास्वप्न आहे कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही। सत्य बाहेर येईलच आणि तरीसुद्धा तुमच्या कपटी बुद्धीने आणि सत्तेच्या मस्तीने माझ्यावर कटकारस्थान केलेच तर मी माझ्या मनाची अशी तयारी केली आहे की, सत्य रक्षणासाठी माझा बळी गेला तरी चालेल. मला खोट्या आरोपात संघर्ष करावा लागला तरी चालेल. मला बदनामी आणि त्रास, त्याग सहन करावा लागला तरी चालेल. मला स्वतः ला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली तरी चालेल. पण मी सत्यासाठी काहीही तडजोड करणार नाही. आणि हो ज्यांच्या प्रेरणेने मी जीवन जगतो आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, नेल्सन मंडेला, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही खोट्या आरोपात षडयंत्र आणि कटकारस्थानात बदनामी आणि शिक्षा सहन करावी लागली आहे. त्यांच्यापुढे मी काय गौण आहे. त्यांच्या एक टक्के फक्त मला सहन करावयाचे आहे. यासाठी या सर्व महापुरुषांनी मला आशीर्वाद दिला आहे.
      काही राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली हे सर्व घडत आहे याची माहिती सर्वांना आहेच. त्यामुळे त्यांची सर्व पिलावळ मी पराजित होण्याची वाट पाहत आहेत. काही तत्त्ववेत्ते म्हणतात, जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी तुमचा व सत्याचा विजय सर्वात आनंद देणारा असतो. अश्या राजकीय नेत्यांना मला सांगावयाचे आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी कधीही तुमच्या वाटेला आलो नाही. पण तुम्हाला मी करत असलेले समाजकार्य आवडत नसेल तर तुम्हीपण फक्त राजकारण न करता, स्वार्थ न ठेवता माझ्यापेक्षा जास्त समाजकार्य करू शकता. यासाठी कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण तुमच्या गावगुंडांना पाठीशी घालणासाठी स्त्रीच्या अब्रूची काळजी न करता अशी खोटी केस करण्याच्या संकल्पनेला ' बुळगापणा ' असेच म्हणावे लागेल. असले कुटील उद्योग करण्यापेक्षा हिम्मत असेल तर समाजकार्य करा आणि गोरगरीब जनतेला न्याय द्या. तुम्ही लवकर सुधारा, स्वतःत बदल घडवा नाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच.
                                                                             आपलाच,
                                                                   प्रमोद महादेव मांडवे
                                                           संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह

#IsupportGm

No comments:

Post a Comment