The Philanthropist The Consultant The Socialist

Saturday 12 September 2015

Humani- उसाला लागली दुष्काळाची हुमणी

उसाला लागली दुष्काळाची हुमणी
    पाऊस नसलेने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मर्यादित पाणीवापरासाठी शासनाने दुष्काळी भागात उस गाळप बंद करण्याचे संकेत दिले असताना आता हुमणी या किडीचा उस शेतीवर प्रादुर्भाव झालेने उस शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होत नाहीत. मान्सूनच्या मोसमात गेले तीन महिने कडक उन पडल्यामुळे खरीप पिकाबरोबर उसदेखील वळत चालला आहे. त्यातच हुमाणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.
     गारपीट,अवकाळी पाऊस आणि आता दुष्काळ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान होत असताना हुमणीच्या प्रादुर्भावाने उसाच्या शेतीची अक्षरशः माती झाली आहे. शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालेने हुमणी सर्वत्र या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी  पाऊसच झाला नसलेने जमिनीमध्ये पाणी नाही त्यामुळे हुमणीला उसाचे क्षेत्र मेजवाणीसारखे पोखरायला मिळत आहे.
किटकनाशके व मेटारायस या बुरशीचा हुमणीवरती वापर करता येतो परंतु जोपर्यंत हुमणी किडा हे स्वतःहून खात नाही तोपर्यंत तो मारत नाही. त्यामुळे सध्यातरी हुमणीवरती सरकारी अथवा खाजगी कोणत्याही यंत्रणेकडे ठोस उपाय नाही. सुलतानी आणि अस्मानी अश्या दोन्ही संकटाना तोंड देणाऱ्या बाळीराजाची फुल नाही पण फुलाची पाखळीदेखील सुयोग्य नियोजन आणि उपाययोजनांच्या अभावी हिरावली जात आहे. यावरती शासनदरबारी त्वरित उपाय काढण्याची शेवटची आशा ठेवून शेतकरी दिवस पुढे ढकलत आहेत.
                           
“ पाउस पडला नसलेने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. उसाला पाणी जास्त लागत असलेने दुष्काळी भागात उस गाळप बंद करणार असलेचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे उस पिकावरती हुमणी या किडीच्या प्रादुर्भावाने जळलेले उसाचे पिकाकडे पाहू शेतकऱ्याची दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे…
                                 - प्रमोद मांडवे

No comments:

Post a Comment