The Philanthropist The Consultant The Socialist

Wednesday, 16 September 2015

humani
हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नियंत्रणाचे उपाय 

हुमणी नष्ट करण्यासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. लागवडीपूर्वी जमिनीची तीन ते चार वेळा नांगरट करावी. भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त ऊस शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील हुमणीच्या अळ्या माराव्यात. शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. खुरपणी करताना मजुरांकडून अळ्या काढून माराव्यात. उसाची तोडणी केल्यानंतर शेत स्वच्छ करावे. त्यात खोडक्‍या, तणे राहू देऊ नयेत. पडीक जमिनीत मुख्यत्वे मे-ऑगस्ट महिन्यात गवताचे ढीग करावेत आणि सकाळी असे ढीग तपासून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी. शेतातील बांधही स्वच्छ ठेवावेत.
जैविकनियंत्रण 
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इत्यादी प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. हुमणीच्या अळी अवस्थेवर कॉम्पसोमेरिस कोलारिस हा परोपजीवी कीटक उपजीविका करतो; परंतु कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची शेतातील संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी हुमणीग्रस्त शेतातील उसावर कीटकनाशकांची फवारणी करू नये. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली, जिवाणू बॅसिलस पॅपिली आणि हेटरोहॅबडेरिस सूत्रकृमी हे "होलोट्रकिया सेरेटा'या जातीच्या हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
रासायनिक उपाय
शेणखत, कंपोस्ट इत्यादींमार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतात चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी, त्यानंतरच शेणखत शेतात टाकावे.
हुमणी जून- जुलै महिन्यांत उसाबरो
बरच इतर पिकांची मुळे खाते, यासाठी प्रादुर्भावग्रस्त शेतातील उसामध्ये, तसेच इतर पिकांमध्ये चार टक्के मॅलॅथिऑन किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी 100 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावी.
ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात 0.3 टक्के दाणेदार कीटकनाशक, फिप्रोनिल 25 किलो प्रति हेक्‍टरी किंवा तीन टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्‍टरी शेतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मिसळावे.
मोठ्या उसात जून ते ऑक्‍टोबर महिन्यात प्रवाही 20 टक्के क्‍लोरपायरिफॉस, पाच लिटर प्रति हेक्‍टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून सरीतून द्यावा

Tuesday, 15 September 2015

सोशल मिडिया- वाईस ऑफ वाईसलेस

        फेसबुक, व्हाटस अॅप, गुगल आणि इंटरनेटच्या वापरामुळे जीवन अधिक सोपे सोयीस्कर झाले आहे. एका क्लिकवरती पैसे पाठवणे, बिल भरणे  खरेदी करणे, मित्रांशी संभाषण करणे त्याचबरोबर सरकारी कामे जसे दाखले नोकरीसाठी अर्ज करणे यामुळे वेळ पैसा वाचण्यासाठी मदत होत आहे.परंतु काहीजण सोशल मिडिया आणि इंटरनेट वापरावर निर्बंध घाला. सोशल मिडिया बंद करा हे पुढच्या पीडिला धोकादायक आहे असा पोरकट कंगवा करीत आहेत. एका बाजूला विकास आणि जलद सेवा देण्याच्या गप्पा मारतात पण ते विसरतात कि इंटरनेट शिवाय हे अश्यक्य आहे. कोणतीही नवी संकल्पना आली कि तिचे जसे फायदे असतात तेवढेच तोटे असतात. पण त्या संकल्पनेचा आपण कसा वापर करतो यावरती ती फायदेशीर कि तोट्याची हे ठरते. अर्थात हे सर्व लोकांच्या द्रुष्टीकोनावर अवलंबून आहे. उदारणार्थ समजा कि एका अंगरक्षकाला मालकाचे संरक्षण करण्यासाठी बंदूक दिली आहे. पण त्याने त्या बंदुकीचा उपयोग लोकांना धमकावण्यासाठी अथवा मालकावरच केला तर त्या बंदुकीचा किंवा बंदूक निर्मात्याचा दोष काय ?
                वाहनांची निर्मिती लोकांचे जीवन सोयीस्कर होण्यासाठी केली आहे. वाहनांचा मानवी जीवनात अतिशय महत्वाचा वाटा आहे.  वाहने नसती तर काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. वाहन कशे चालवावे याचा निर्णय वाहकाच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून आहे. त्याच्या चुकीच्या गाडी चालवण्याने अपघात झाला आणि निष्पापांचा बळी गेला याचा दोष वाहनाला अथवा वाहन निर्मात्याला देणे योग्य नाही.
       तसेच इंटरनेट व सोशल मिडियाच्या गैरवापराने झालेल्या नुकसानीला इंटरनेट व सोशल मिडिया जबाबदार असू शकत नाही. अथवा त्यावरती निर्बंध घालणे योग्य नाही. सोशल मिडियामुले अनेक फायदेदेखील होतात हे विसरून चालणार नाही.
       अलीकडेच असे दिसून आले आहे कि, आयसीस सारखी जगाची डोकेदुखी झालेली आतंकवादी संघटना भारतातील तरुणांना सोशल मिडिया आणि इंटरनेटद्वारे भडकावून त्यांना देशविरोधी आतंकवादी कारवाईस प्रवृत्त करतात. यावरती सोशल मिडिया व इंटरनेटला दोष न देता असे प्रभोषक साहित्य देशात येवू नयेत यासाठी इंटरनेट फिल्टर बसवणे गरजेचे आहे. शिस्त हि प्रशासनाचे माकडहाड आहे असे म्हणतात. भारतासारखी सार्वभौम लोकशाही असणार्या देशात कायदे कठोर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कर- णारी यंत्रणा अतिशय कुमकुवत, भ्रष्टाचारी वेळखाऊ असलेने यामध्ये साधा मच्छरसुधा सापडत नाही. पण सोशल मिडियाच्या वापरावरच निर्बंध घालून लोकशाही तत्वांची आणि अधिकारांची पायमल्लीच होईल. जे सर्वसामान्य लोक प्रिंट मिडिया टीव्ही सारख्या माध्यमांपर्यंत पोहचू शकत नाहीत ते सार्वजनिक समस्या निवारणासाठी सोशल मिडियाचा वापर करतात. त्यामुळे अश्या प्रकारचे निर्बंध घातले तर वाईस ऑफ वाईसलेस असलेल्या सोशल मीडियाच्या बचावासाठी सर्वसामान्य क्रांती करतील.

                            - प्रमोद मांडवे

Saturday, 12 September 2015

उसाला लागली दुष्काळाची हुमणी
    पाऊस नसलेने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मर्यादित पाणीवापरासाठी शासनाने दुष्काळी भागात उस गाळप बंद करण्याचे संकेत दिले असताना आता हुमणी या किडीचा उस शेतीवर प्रादुर्भाव झालेने उस शेतकऱ्यांची संकटे काही केल्या कमी होत नाहीत. मान्सूनच्या मोसमात गेले तीन महिने कडक उन पडल्यामुळे खरीप पिकाबरोबर उसदेखील वळत चालला आहे. त्यातच हुमाणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.
     गारपीट,अवकाळी पाऊस आणि आता दुष्काळ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान होत असताना हुमणीच्या प्रादुर्भावाने उसाच्या शेतीची अक्षरशः माती झाली आहे. शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालेने हुमणी सर्वत्र या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी  पाऊसच झाला नसलेने जमिनीमध्ये पाणी नाही त्यामुळे हुमणीला उसाचे क्षेत्र मेजवाणीसारखे पोखरायला मिळत आहे.
किटकनाशके व मेटारायस या बुरशीचा हुमणीवरती वापर करता येतो परंतु जोपर्यंत हुमणी किडा हे स्वतःहून खात नाही तोपर्यंत तो मारत नाही. त्यामुळे सध्यातरी हुमणीवरती सरकारी अथवा खाजगी कोणत्याही यंत्रणेकडे ठोस उपाय नाही. सुलतानी आणि अस्मानी अश्या दोन्ही संकटाना तोंड देणाऱ्या बाळीराजाची फुल नाही पण फुलाची पाखळीदेखील सुयोग्य नियोजन आणि उपाययोजनांच्या अभावी हिरावली जात आहे. यावरती शासनदरबारी त्वरित उपाय काढण्याची शेवटची आशा ठेवून शेतकरी दिवस पुढे ढकलत आहेत.
                           
“ पाउस पडला नसलेने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. उसाला पाणी जास्त लागत असलेने दुष्काळी भागात उस गाळप बंद करणार असलेचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे उस पिकावरती हुमणी या किडीच्या प्रादुर्भावाने जळलेले उसाचे पिकाकडे पाहू शेतकऱ्याची दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे…
                                 - प्रमोद मांडवे